
ILT20 Final 2025: रविवारी (9 फेब्रुवारी) आयएलटी20 स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना खेळला गेला. दुबई येथे झालेल्या या अंतिम सामन्यात दुबई कॅपिटल्स (Dubai Capitals) व डेझर्ट वायपर्स (Desert Vipers) हे संघ समोरासमोर होते. अंतिम षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दुबई कॅपिटल्सने विजय मिळवत पहिल्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली. यानंतर संघाचा अष्टपैलू गुलबदीन नईब (Gulbadin Naib) याने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.
𝐘𝐀𝐇𝐀𝐀𝐍 𝐊𝐄 𝐑𝐀𝐙𝐀 𝐇𝐀𝐈 𝐒𝐈𝐊𝐀𝐍𝐃𝐀𝐑 🤘👑
Dubai Capitals are the #DPWorldILT20 Season 3️⃣ 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆✨#ILT20onZee #T20HeroesKaJalwa #DCvDV #SikandarRaza | @SRazaB24 pic.twitter.com/cY19wpWqdH
— Zee Cricket (@ilt20onzee) February 9, 2025
Gulbadin Naib Celebration After ILT20 Final
विजयासाठी मिळालेल्या 190 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात आवश्यक असलेल्या 9 धावा सिकंदर रझा याने दोनच चेंडूत पूर्ण केल्या. यानंतर सर्व खेळाडू मैदानाकडे धावले असताना, नईब याने ड्रेसिंग रूममध्ये आपली जर्सी काढून हवेत फिरवली. त्याचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. नईब नेहमीच आपल्या निरनिराळ्या सेलिब्रेशनसाठी चर्चेत असतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
नईब याच्या या सेलिब्रेशनने अनेक चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly Celebration) याची आठवण झाली. त्याने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरच्या बाल्कनीमध्ये अशाप्रकारे जर्सी काढून फिरवली होती.
(Gulbadin Naib Replicate Sourav Ganguly Celebration After ILT20 Final)
Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती