
Sunil Gavaskar 76 Birthday: भारतीय क्रिकेटमधील सुवर्णपान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय फलंदाजीला खऱ्या अर्थाने नवी ओळख देणाऱ्या सुनील गावसकर यांचा 10 जुलै रोजी 76 वा वाढदिवस साजरा होता. फलंदाज म्हणून अनेक विक्रमांचे इमले रचत क्रिकेटविश्वावर अमीट छाप पाडणाऱ्या गावसकर यांना ही संधी मिळालीच नसती. केवळ त्यांच्या एका काकांमुळे भारतीय क्रिकेटला सुनील गावसकर मिळाले. त्याचीच ही छोटीशी गोष्ट.
1️⃣9⃣8⃣3⃣ World Cup-winner 🏆
233 international matches 👍
13,214 runs in international cricket 👌
First batter to score 1️⃣0⃣0⃣0⃣0⃣ runs in Tests 🔝Here's wishing Sunil Gavaskar – former #TeamIndia Captain & batting legend – a very Happy Birthday! 🎂👏 pic.twitter.com/mBCMwsDWcm
— BCCI (@BCCI) July 10, 2025
Sunil Gavaskar Got Exchanged At His Birth With Fisherman’s Son
सुनील गावसकर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईने यांना प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर एका दवाखान्यात भरती केले गेले होते. या दवाखान्यातच गावसकर यांचा जन्म झाला. संपूर्ण कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अशातच दुसऱ्या दिवशी त्यांचे एक काका नारायण मसुरकर हे त्यांना पाहायला दवाखान्यात आले. त्यांनी त्या बाळाला आपल्या हातात घेतले आणि त्याचे लाड केले.
दुसऱ्या दिवशी नारायण मसुरकर पुन्हा एकदा दवाखान्यात पोहोचले. यावेळी त्यांनी बाळाला हातात घेतले आणि काही क्षणातच हे आपले बाळ नसल्याचे ते म्हटले. सर्वत्र एकच गदारोळ झाला. त्यांनी थेट ते बाळ बदलल्याचे म्हटल्यामुळे दवाखान्यातील प्रशासनही गांगरून गेले. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मसुरकर आपल्या म्हणण्यावर ठाम होते. मसुरकर यांनी सांगितले की, “मी काल बाळाला पाहून गेलो आहे. बाळाच्या एका कानाच्या पाळीवर छोटेसे छिद्र होते. या मुलाच्या कानावर तसे कोणतेही छिद्र नाही. पटकन ते बाळ शोधून द्या.”
सर्वांनी शोधाशोध केल्यानंतर जवळच्याच एका कोळीणीच्या कुशीत ते बाळ होते. आंघोळ घातल्यानंतर मुलांना ठेवताना ही अदलाबदली झाली होती. मसुरकर यांच्या प्रसंगावधानाने गावसकर कुटुंबीयांना त्यांचे खरे बाळ आणि क्रिकेटजगताला ‘लिटल मास्टर’ मिळाले. स्वतःला गावसकर यांनी आपल्या ‘सनी डेज’ (Sunny Days) या आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत सुनील गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारे व 34 कसोटी शतक करणारे पहिले फलंदाज होते. आपल्या नजाकतदार फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सनी जीना हॅपी बर्थडे!
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ दाखवणारे सुनील गावसकर
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।