Breaking News

WIvsAUS: मिचेल स्टार्कने ओकली आग! वेस्ट इंडिज अवघ्या 27 धावांवर गारद

wi vs aus
Photo Courtesy: X

WIvsAUS: वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सोमवारी (14 जुलै) समाप्त झाला. चौथ्या डावात विजयासाठी 204 धावांचे आव्हान असतात, यजमान वेस्ट इंडीज संघ केवळ 27 धावांमध्ये सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc 6 Fer) याने सर्वाधिक सहा बळी मिळवले. तर, स्कॉट बोलॅंड याने ‌हॅट्रिक मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले. यासह ऑस्ट्रेलियाने फ्रॅंक वॉरेल ट्रॉफी 3-0 अशी आपल्या नावे केली.

WIvsAUS Australia Beat West Indies

पहिल्या दोन सामन्यात एकतर्फी विजय मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाने सबीना पार्क येथे झालेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 225 धावा केल्या. मात्र, गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांवर गुंडाळत संघाला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही 121 धावांवर समाप्त झाला. त्यामुळेच माणसांना विजयासाठी 204 धावांचा आव्हान मिळाले.

या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान वेस्ट इंडिज कोणताही प्रतिकार करू शकले नाही. मिचेल स्टार्क याने गोलंदाजी ची सुरुवात आपल्या पहिल्या 15 चेंडूतच वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यांचे केवळ 11 धावांमध्ये सहा फलंदाज बाद झाले. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या स्कॉट बोलॅंड याने हॅट्रिक मिळवत वेस्ट इंडिजचा डाव 27 धावांमध्ये संपुष्टात आणला. ही कसोटी इतिहासातील दुसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. आपला शंभरावा सामना खेळणारा स्टार्क सामनावीर व मालिकावीर ठरला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: जड्डूसह बुमराह-सिराजची झुंज अपयशी! थरारक Lords Test जिंकत इंग्लंडची मालिकेत 2-1 आघाडी