Breaking News

दिव्या की हंपी? भारतात कोण आणणार FIDE Chess World Cup 2025 ची ट्रॉफी?

fide chess world cup 2025
Photo Courtesy; X

FIDE Chess World Cup 2025 Final: जॉर्जिया येथे खेळल्या जात असलेल्या महिला  फिडे चेस विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याला  शनिवारी (27 जुलै ) सुरूवात होईल. या अंतिम सामन्यात भारताच्याच दिव्या देशमुख (Divya Deshmukh ) व कोनेरू हंपी (Koneru Humpy ) या आमने-सामने असतील. शनिवारी सामन्यातील पहिला गेम खेळला जाईल. तर, दूसरा गेम रविवारी होईल.

FIDE Chess World Cup 2025 Final

उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताच्या या दोन्ही बुद्धिबळपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला बुद्धिबळपटू होत्या. त्यानंतर उपांत्य फेरीत दोघींनीही चीनच्या बुद्धिबळपटूंना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता पहिला गेम खेळला जाईल. त्यानंतर रविवारी याचवेळी दुसरा गेम होणार आहे. आवश्यकता भासल्यास सोमवारी (28 जुलै) टायब्रेकर सामना खेळला जाईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: शाब्बास पोरी! नागपूरच्या Divya Deshmukh ने गाठली चेस वर्ल्डकपची फायनल, इतिहास एका पावलावर