Breaking News

US Open 2025 वर अल्कारेझचा कब्जा! सिन्नर पुन्हा उपविजेता

us open 2025
Photo Courtesy: X

US Open 2025: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन स्पर्धेची रविवारी (7 सप्टेंबर) समाप्ती झाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिन्नर (Jannik Sinner) याला पराभूत करत आपले सहावे ग्रँडस्लॅम जिंकले. यासोबतच अल्कारेझ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

Carlos Alcaraz Won US Open 2025

भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री उशिरा झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. अल्कारेझ याने 6-2 असा पहिला सेट आपल्या नावे केला. तर, सिन्नरने दुसरा सेट जिंकून पुनरागमन केले. त्यानंतर मात्र अल्कारेझने 6-1 व 6-4 असे सलग दोन सेट जिंकून सामना आपल्या नावे केला. त्याच्या कारकिर्दीतील हे सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

चालू असलेल्या वर्षातील चारही ग्रँडस्लॅम्स स्पर्धांपैकी अमेरिकन ओपन व विम्बल्डन ग्रँडस्लॅम सिन्नर याने आपल्या नावे केले. तर, फ्रेंच ओपन व युएस ओपनचे विजेतेपद अल्कारेझने पटकावले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: भारताने उंचावला Asia Cup Hockey 2025, अजिंक्य राहत मिळवले वर्ल्डकप तिकीट