
Pawan Sehrawat Ejected From PKL 12: तमिल थलायवाज संघाचा कर्णधार व हायफ्लायर नावाने ओळखला जाणारा अनुभवी रेडर पवन सेहरावत याच्यावर तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) संघाने कारवाई केली आहे. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) 2025 मधून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला. शिस्तभंगाचे कारवाई करत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
Breaking News 🚨
Tamil Thalaivas have officially released their captain Pawan Sehrawat from the remainder of PKL Season 12
.
.
.#pawansehrawat #tamilthalaivas #Prokabaddi #PKLSeason12 #Kabaddi360 pic.twitter.com/6zR1VPzGR8— Kabaddi360 (@Kabaddi_360) September 13, 2025
Pawan Sehrawat Ejected From PKL 12
काही दिवसांपूर्वी पवन हा संघाच्या सराव सत्रात दिसला नव्हता. दुसऱ्या लेगसाठी सर्व संघ जयपूर येथे आल्यानंतर पवन याने संघासोबत प्रवास केलेला नाही. आता तमिल थलायवाज संघाने अधिकृत निवेदन जाहीर करत, पवनला चालू हंगामासाठी संघाबाहेर करत असल्याचे स्पष्ट केले.
तमिल थलायवाजने सार्वजनिक केलेल्या निवेदनात म्हटले, ‘पवन सेहरावत याला उर्वरित हंगामातून बाहेर करत घरी पाठवण्यात आले आहे. त्याने केलेल्या शिस्तभंगानंतर संघाच्या नियमानुसार हे कारवाई केली गेली.’
याच हंगामात बेंगळुरू बुल्स संघाने देखील आपला कर्णधार अंकुश राठी याला देखील संघातून मुक्त केले आहे. मात्र, त्याच्यावर कोणत्या कारणाने कारवाई करण्यात आली, याबाबत कोणतीही स्पष्टता मिळाली नाही.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: PKL 12 मध्ये जोरदार ड्रामा! चालू हंगामातच कर्णधाराने सोडली संघाची साथ
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।