
Mohun Bagan Super Giant Withdraw From ACL 2: इंडियन सुपर लीग विजेता फुटबॉल क्लब मोहन बागान सुपर जायंटने सध्या सुरू असलेल्या एएफसी चॅम्पियन्स लीग 2 स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हा भारतीय संघ खेळताना दिसणार नाही.
AFC confirms that 🇮🇳 Mohun Bagan are considered to have withdrawn from #ACLTwo! https://t.co/vrH9k6K2Hw
— #ACLElite | #ACLTwo (@TheAFCCL) September 30, 2025
Mohun Bagan Super Giant Withdraw From ACL 2
मोहन बागान स्पर्धेतील आपला दुसरा सामना इराणचा क्लब सेपाहानविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव मोहन बागान संघातील विदेशी खेळाडूंनी इराणमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंच्या निर्णयाचा आदर करत संघ व्यवस्थापनाने स्पर्धेतूनच माघार घेत असल्याचे आयोजकांना सांगितले आहे. सध्या इराण व इजराईल यांच्या दरम्यान युद्धजन्य स्थिती असून, विविध देशातील नागरिकांना इराणमध्ये जाण्यास त्यांच्या सरकारने प्रतिबंधित केले आहे. मोहन बागानला आपल्या पहिल्या सामन्यात घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागले होते.
मोहन बागान स्पर्धेतून बाहेर पडल्याने क गटात केवळ तीनच संघ खेळताना दिसतील. मोहन बागानला पराभूत करणाऱ्या अहाल एफसीचे दोन गुण वजा करण्यात आले असून, ते शून्य सामने आणि शून्य गुण अशा प्रकारे पुन्हा सुरुवात करतील. याच स्पर्धेत भारताचा दुसरा संघ एफसी गोवा ड गटात खेळताना दिसत आहे. याच गटात दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अल नासेर क्लब देखील असून, रोनाल्डो भारतात खेळायला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: PKL 12 मध्येही ‘नो हँडशेक’! हरियाणा-दिल्ली सामन्यात नक्की काय घडलं?