Breaking News

Rohit Sharma च्या ‘कॅप्टन्स एरा’ची समाप्ती! दिमाखदार राहिली कारकीर्द, वाचा सविस्तर, 2023…

rohit sharma
Photo Courtesy: X

Rohit Sharma removed as India’s ODI captain: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार म्हणून शुबमन गिल याची निवड करण्यात आली. यासोबतच भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या रोहित शर्मा याची कर्णधार म्हणून भारतीय संघासोबतची कारकीर्द समाप्त झाली. पूर्णवेळ कर्णधार म्हणून मिळालेल्या जवळपास पाच वर्षाच्या कार्यकाळात त्याने भारतीय संघासाठी सर्वोच्च योगदान दिले. 

Rohit Sharma removed as India’s ODI Captain

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेसाठी रोहित व विराट हे दोन्ही अनुभवी खेळाडू संघात परतले. मात्र, संघाचे नेतृत्व युवा गिल करेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विजयानंतर रोहित 2027 वनडे विश्वचषकापर्यंत कर्णधार राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, बीसीसीआय व निवड समितीने विश्वचषकाच्या बरोबर दोन वर्ष आधी नवा कर्णधार संघाला दिला.

रोहित याच्याकडे 2020 मध्ये भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. तत्पूर्वी, 2018 आशिया कपमध्ये काळजीवाहू कर्णधार म्हणून खेळताना त्याने संघाला विजेता बनवलेले. तसेच, 2013 ते 2020 या कालावधीत मुंबई इंडियन्सला त्याने पाच वेळा आयपीएल विजेतेपद आपल्या नेतृत्वात मिळवून दिलेले.

भारतासाठी 24 कसोटीमध्ये नेतृत्व केले. यामध्ये 12 सामने भारत जिंकला. तर, 9 सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागलेला. तसेच 3 सामने अनिर्णित राहिले. त्याच्या नेतृत्वात भारताच्या विजयाची टक्केवारी 50 टक्के इतकी राहीली‌. रोहित कर्णधार असताना 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात भारत पराभूत झालेला.

टी20 क्रिकेटमध्ये देखील रोहितच्या नेतृत्वात भारत कमालीचा यशस्वी ठरला. त्याच्या नेतृत्वात भारताने 62 सामने खेळले. त्यापैकी तब्बल 50 सामन्यात संघ विजयी ठरला. तर, 12 सामने गमवावे लागले. या प्रकारात भारताचे विजयाची टक्केवारी 80 टक्के इतकी जबरदस्त राहिली. त्याच्याच नेतृत्वात भारताने 2024 मध्ये टी20 विश्वचषक आपल्या नावे केला.

वनडे क्रिकेटमध्ये रोहितने फलंदाज व कर्णधार म्हणून छाप पाडली. तब्बल बारा वर्षांनंतर त्याच्या नेतृत्वात भारत 2023 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला. मात्र, त्यावेळी भारताला अपयशाला सामोरे जावे लागले. याची भरपाई 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने करून दिली. भारताने 12 वर्षानंतर आयसीसी वनडे ट्रॉफी आपल्या नावावर केली. रोहितच्या नेतृत्वात भारताने 56 वनडे सामने खेळताना 42 सामने जिंकलेले. तर, केवळ बारा सामने संघाला गमवावे लागले. या प्रकारात त्याच्या विजयाची टक्केवारी तब्बल 75 टक्के इतकी राहिली.

Latest Sports News In Marathi

 

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: India Tour Of Australia 2025: ‘कॅप्टन हिटमॅन’ पर्व संपले! हा फलंदाज बनला भारताचा नवा वनडे कर्णधार