Breaking News

Ryan Williams चा भारतीय फुटबॉल संघाला ‘ट्रिपल’ फायदा, ऑस्ट्रेलिया सोडून भारतासाठी खेळणे ठरणार ‘गेमचेंजर’

ryan williams
Photo Courtesy: X

Ryan Williams In Indian Football Team: ऑस्ट्रेलियाचा फुटबॉलपटू रायन विल्यम्स हा मागील आठवड्यात भारतीय फुटबॉल संघासाठी खेळण्याकरीता पात्र झाला आहे. ओसीआय खेळाडू म्हणून आधीच एआयएफएफ (AIFF) च्या रडारवर असलेल्या विल्यम्स याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व सोडत, भारतीय नागरिकत्व स्विकारले. त्यानंतर त्याची थेट भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली. त्याच्या या समावेशामुळे भारतीय संघाला फायदा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ryan Williams In Indian Football Team

सध्या 32 वर्षांचा असलेल्या विल्यम्स याची आई भारतीय असल्याने तो भारतासाठी खेळण्याकरता पात्र ठरला. ऑस्ट्रेलियासाठी एक आंतरराष्ट्रीय सामना त्याने खेळला आहे. इंग्लंडमधील फुलहॅम संघासाठी त्याने खेळ दाखवला असून, मागील तीन वर्षांपासून तो भारतात बेंगळुरू एफसीसाठी खेळतोय. त्याच्या समावेशामुळे भारतीय संघाच्या आक्रमणाला धार मिळेल. मात्र, त्याच्यामुळे भारतीय फुटबॉल संघाला कोणते फायदे होतील, हे आपण जाणून घेऊया.

1) अनुभवाची भक्कम शिदोरी: विंगर म्हणून खेळणारा विल्यम्स भारताचा आक्रमणात महत्त्वाचे भूमिका बजावेल. सुनील छेत्री भारतीय संघातून जवळपास बाहेर झालेला असताना विल्यम्स ती जागा घेऊ शकतो. त्याला आपल्या देशात 300 पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव आहे. तसेच, त्याने बराच स्पर्धात्मक फुटबॉल खेळला असल्याने भारतीय संघाच्या गोल मारण्याच्या सरासरीत नक्कीच वाढ होऊ शकते.

2) वेग व नेतृत्व: विल्यम्स हा संघासाठी आक्रमक म्हणून खेळतो. भारतीय आक्रमक मागील काही काळापासून अनेक छोट्या छोट्या चुका करत गोल करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे आक्रमणाचे नेतृत्व करत विल्यम्स आपल्यात वेगवान खेळाने गोल करण्याच्या अधिक संधी निर्माण करेल. भारतात खेळण्याचा त्याला अनुभव असून, बेंगळुरूसाठी त्याने तेरा गोल झळकावले आहेत.

3) वेगवेगळ्या जागांवर खेळण्याची क्षमता: रायन विल्यम्स हा मध्यफळी व आक्रमक अशा दोन्ही आघाड्यांवर खेळू शकतो. राईट विंगर म्हणून खेळत असला तरी, तो लेफ्ट विंगर व अटॅकिंग मिडफिल्डर या स्थानांवर खेळण्याची क्षमता ठेवतो. संघाचे प्रशिक्षक खालिद जमील यांच्यासाठी असा अष्टपैलू खेळाडू असणे, सकारात्मक ठरेल.

विल्यम्स बांगलादेशविरुद्धच्या एएफसी एशिया कप 2026 पात्रता फेरी सामन्यात भारतासाठी खेळताना दिसेल. मात्र, भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?