Breaking News

Womens Kabaddi World Cup 2025 मध्ये विश्वविजेतेपद राखण्यासाठी उतरणार भारतीय रणरागिणी! इथे पाहा लाईव्ह सामने

womens kabaddi world cup 2025
Photo Courtesy: X

Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेशमध्ये सोमवारपासून (17 नोव्हेंबर) दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जातेय. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल.

Womens Kabaddi World Cup 2025 Starts On 17 November

भारतातील पटना येथे 2012 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकानंतर तब्बल तेरा वर्षांनी दुसऱ्या विश्वचषक खेळला जाईल. यावेळी बांगलादेशच्या ढाका येथील शहीद सुहरावर्दी इनडोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडेल. कबड्डी विश्वचषकाची स्पर्धा प्रथमच भारताबाहेर होताना दिसेल. यापूर्वी जून महिन्यात ही स्पर्धा बिहार येथे खेळण्यात येणार होती. त्यानंतर निर्णय बदलत ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे स्पर्धा हलवण्यात आली. मात्र, आता अखेर ही स्पर्धा ढाका येथे होईल. अकरा संघांची ही स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

भारतीय संघ अ गटात असून यजमान बांगलादेश, थायलंड, जर्मनी व युगांडा त्यांना आव्हान देतील. तर दुसऱ्या गटात चायनीज तैपई, इराण, नेपाळ, झांबियार, पोलंड व केनिया यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. भारतात टी स्पोर्ट्सच्या युट्युब चॅनेलवर स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

महिला कबड्डी विश्वचषक 2025 साठी भारतीय संघ: रितू नेगी (कर्णधार), पुष्पा राणा (उपकर्णधार), सोनाली शिंगटे, पूजा नरवाल, भावना ठाकूर, साक्षी शर्मा, पूजा काजला, चंपा ठाकूर, मिनी नरवाल, रितू शेरॉन, रितू मिथरवाल, संजू देवी, धनलक्ष्मी, अनु कुमारी. प्रशिक्षक: तेजस्विनी बाई व कविता सेल्वराज

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस