Breaking News

कोण आहे हा Kartik Sharma? आयपीएल 2026 लिलावाआधीच मार्केटमध्ये चाललंय नाव

kartik sharma
Photo Courtesy: X

Kartik Sharma: आयपीएल 2026 (IPL 2026) साठी खेळाडूंचे रिटेन्शन नुकतेच पार पडले. सर्व दहा संघानी आपले प्रमुख खेळाडू यावेळी कायम ठेवले. आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा मिनी लिलाव (IPL 2026 Auction) 16 डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होईल. तत्पूर्वी, एका युवा भारतीय फलंदाजाचे नाव अचानक चर्चेत आले आहे. तो या लिलावात कोट्याधीश नक्की होणार असे मानले जातेय.

Who Is Kartik Sharma?

आयपीएल रिटेन्शननंतर अचानकपणे राजस्थानचा युवा यष्टिरक्षक फलंदाज कार्तिक शर्मा हा चर्चेत आला आहे. दिल्लीविरुद्ध रणजी सामन्यात तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने कर्णधार महिपाल लोमरोर याच्यासोबत 225 धावांची भागीदारी केली. कार्तिकने 120 धावांची खेळी केली.‌ यामध्ये पाच चौकार आणि तब्बल नऊ षटकार सामील होते. याआधी मुंबईविरुद्ध त्याने 139 धावांची खेळी केली होती. मागील हंगामात पदार्पण करताना त्याने उत्तराखंडविरूद्धही शतकी मजल मारलेली.

रणजी ट्रॉफीप्रमाणेच लिस्ट ए पदार्पणात विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने महाराष्ट्राविरूद्ध 90 चेंडूत 7 चौकार व 11 षटकारांच्या मदतीने 123 धावा कुटलेल्या. टी20 मध्ये आतापर्यंत केवळ 7 सामने तो खेळला आहे. यामध्ये 164 चा स्ट्राईक रेट राखण्यात त्याला यश आले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: कधी होणार‌ Vaibhav Suryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री? प्रशिक्षकांनीच दिली महत्वाची अपडेट

यष्टिरक्षक व फिनिशर फलंदाज असलेला कार्तिक आयपीएल कॅम्पचा अनुभव देखील घेऊन बसला आहे. मागील वर्षी त्याने आरसीबी संघासाठी ट्रायल दिली होती. तसेच, बराच काळ चेन्नई सुपर किंग्स संघासाठी देखील तो मेहनत करताना दिसलेला. वंश बेदी दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतर कार्तिक याला त्याच्या जागी संधी मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र, मागील वर्षी त्याने आयपीएल लिलावासाठी नावनोंदणी न केल्याने त्याला संधी मिळाली नाही. मात्र, यावर्षी या युवा खेळाडूवर सर्वांची नजर असेल. त्यामुळे तो पहिल्याच लिलावात कोट्याधीश होणार, असे कयास लावले जात आहेत.

Latest Sports News In Marathi