
Joe Root Hits First Test Century In Australia: प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील (Ashes Series) दुसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना शानदार खेळ केला. अनुभवी जो रूट याने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील आपले पहिले शतक पूर्ण केले.
Joe Root savours his 40th Test ton in the Gabba Test 🤩👌#WTC27 | #AUSvENG 📝: https://t.co/BNKjBSJuJb pic.twitter.com/udXqJ3b9dB
— ICC (@ICC) December 4, 2025
Joe Root Hits First Test Century In Australia
मागील 13 वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या रूटला कसोटीत एकही शतक करता आले नव्हते. मात्र, अखेर त्याने ऑस्ट्रेलियात पूर्ण करण्याचा कारनामा केला. ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी अवघ्या पाच धावांवर दोन बळी गेल्यानंतर रूट फलंदाजीला आला. त्याने शानदार फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरला.
अखेरच्या सत्रात त्याने आपले शतक पूर्ण केले. हे कसोटी कारकिर्दीतील त्याचे 40 वे शतक ठरले. ऍशेस 2025-2026 (Ashes 2025-2026) मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने रूटने या मालिकेत शतक न केल्यास एमसीजीवर न’ग्न फिरण्याचे म्हटले होते. मात्र, आता रूटने शतक केल्याने तो बेअब्रू होण्यापासून वाचला आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Raipur ODI मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राज! 358 धावांचा केला सहज पाठलाग
kridacafe