क्रीडा कॅफे ही मराठीतील सर्वात नवी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट आहे. काही हौशी मराठी क्रीडा पत्रकारांनी ही वेबसाईट सुरू केली असून, या वेबसाईटची स्थापना १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच स्थानिक पातळीवरील सर्व खेळांच्या बातम्या, खेळाडूंच्या मुलाखती, अग्रलेख, व्हिडीओ तसेच ग्राफिक्सच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरील समस्त मराठी जनांसाठी क्रीडाजगतातील माहिती क्रीडा कॅफेकडून सर्वात वेगाने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी काळात क्रीडा क्षेत्राची वाढत असलेली व्याप्ती लक्षात घेता, क्रीडा कॅफे सातत्याने नवनव्या संकल्पनातून क्रीडाप्रेमीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करेल.
क्रीडा कॅफे आपल्याला सर्वच प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, त्यामध्ये फेसबुक, एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्युब व थ्रेड यांचा समावेश आहे. याबरोबरच क्रीडा कॅफेच्या माध्यमातून भविष्यात उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा देखील विचार करण्यात येतोय. तसेच, क्रीडा पत्रकारिता करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीचा अनुभव देण्यात येईल.