![Igor Stimac](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/IGOR-STIMAC.jpg)
Igor Stimac Sacked: भारतीय फुटबॉल संघाचे (Indian Football Team) मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांचे भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) तात्काळ प्रभावाने हकालपट्टी केली आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ही कारवाई करण्यात आली.
AIFF terminates the services of Head Coach Igor Stimac!
Read more details here 👉🏻 https://t.co/oHZpY9tr7T#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/fupnL5UrVS
— Indian Football Team (@IndianFootball) June 17, 2024
मागील आठवड्यात दोहा येथे झालेल्या फिफा विश्वचषक पात्रता फेरी 2026 च्या अखेरच्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते. मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ सातत्याने खराब कामगिरी करताना दिसला. त्यामुळे स्टिमॅक यांची गच्छंती होणार असा कयास लावला जात होता. मंगळवारी (17 जून) महासंघाचे उपाध्यक्ष एएन हारिस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. भारतीय फुटबॉलला दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानत हा निर्णय सार्वजनिक केला गेला.
स्टिमॅक यांनी 2019 मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने दोन वेळा सॅफ कप व एकदा इंटर कॉन्टिनेन्टल कप जिंकण्याची कामगिरी केली. करारापूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद काढून घेण्यात आल्यामुळे महासंघ त्यांना नुकसान भरपाई म्हणून 3,60,000 डॉलर्स म्हणजे जवळपास तीन कोटी रुपये देण्याची शक्यता आहे.
स्टिमॅक हे क्रोएशियाचे माजी खेळाडू राहिले आहेत. सन 1998 फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या क्रोएशिया संघात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या देशाचा राष्ट्रीय संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील सेवा दिली आहे.
(AIFF Sacked Igor Stimac As Indian Football Team Head Coach)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।