Breaking News

तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन

ajinkya rahane
Photo Courtesy: X

Ajinkya Rahane On Marathwada Flood: सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. विशेषता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने राज्यातील सर्व नागरिकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले.

Ajinkya Rahane On Marathwada Flood

मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यांमध्ये सध्याची परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतासह राहत्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर बोलताना अजिंक्य रहाणे याने एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो म्हणाला, “सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होतेय. शेतकऱ्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या ताटात अन्न येत असते. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तशी मदत करावी. मी देखील एक शेतकरी पुत्र असून, माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करेल. सरकार देखील त्यांच्या पातळीवर योजना आखत आहे. मात्र, आपल्याच लोकांसाठी आपल्याला पुढे यावे लागेल.”

त्याच्या या कृतीचे जोरदार कौतुक होत आहे. रहाणे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. यापूर्वी देखील तो अनेकदा शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम राबवताना दिसलेला. तसेच, सुट्टीच्या काळात तो आपल्या गावी येऊन शेती देखील करतो.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Pro Kabaddi लाही लागली फिक्सिंगची कीड? दिग्गजाचा मोठा दावा, “PKL 12 मध्ये…”