Breaking News

भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून Antonio Lopez Habas यांच्या नावाची चर्चा का? 68 वर्ष वय तरीही…

antonio lopez habas
Photo Courtesy: X

Antonio Lopez Habas Favourite For Indian Football Team New Head Coach: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी भारताच्या वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहिरात काढली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 13 जुलै असून, त्यानंतर भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल. मात्र, या पदासाठी स्पेनचे अनुभवी प्रशिक्षक ऍंटोनियो लोपेझ हबास यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय फुटबॉलमध्ये ते मोठा बदल घडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Antonio Lopez Habas Favourite For Indian Football Team New Head Coach

स्पेनचे नागरिक असलेले हबास सध्या 68 वर्षांचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज देखील केला आहे. बरेचसे खेळाडू आणि भारतीय चाहते त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून पाहू इच्छितात. त्यामुळे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असलेली दिसते.

हबास हे मागील दहा वर्षांपेक्षा अधिकच्या काळापासून भारतात फुटबॉल प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात एटीकेने 2014 व एटीके मोहन बागान यांनी 2019-2020 मध्ये इंडियन सुपर लीग जिंकली होती. तसेच 2023 मध्ये मोहन बागान सुपरजायंट्सला त्यांनी शिल्ड जिंकून दिलेली. सध्या ते आय-लीगमध्ये विजेतेपदाचे दावेदार असलेल्या इंटर काशी संघाला मार्गदर्शन करतात. भारतीय खेळाडूंशी त्यांचे संबंध मित्रत्वाचे असल्याचे सांगितले जाते. भारतात मोठा काळ घालवल्याने त्याचा फायदा राष्ट्रीय संघासाठी होऊ शकतो.

हबास हे 1996-1997 या काळात बोलिविया राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांनी या संघाला कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत नेलेले. तसेच स्पेनमधील वेलेंसिया व सेल्टा विगो या मोठ्या क्लबचे देखील ते मॅनेजर राहिले आहेत.

मनेलो मार्केझ यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या एका वर्षात, संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. एएफसी एशिया कप 2027 पात्रता फेरीत भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताला उर्वरित चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे भारतीय फुटबॉलमध्ये मोठे बदल होत आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान, 2030 फिफा वर्ल्डकप लक्ष्य