Breaking News

Asian Youth Games 2025: भारताच्या कबड्डी संघात महाराष्ट्राचे सहा जण

asian youth games 2025
Photo Courtesy: X

Asian Youth Games 2025: बहारीन येथील मनमा येथे होणाऱ्या तिसऱ्या आशिया युवा क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय मुले व मुलींच्या संभाव्य कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुलांच्या संघात महाराष्ट्र व विदर्भाच्या प्रत्येकी दोन मुलांचा तर, मुलींच्या संघात महाराष्ट्राच्या दोन मुलींचा समावेश आहे. पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये कबड्डी खेळ खेळला जाईल.

Asian Youth Games 2025 Indian Kababdi Teams

मनामा येथे 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर यादरम्यान या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. प्रथमच कबड्डीचा समावेश स्पर्धेत केला गेला असताना, भारत विजेतेपदाचा दावेदार म्हणून उतरेल. कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात 12 तर मुलींच्या गटात 10 संघ सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, संघटनेने संभाव्य संघांची घोषणा केली. याच खेळाडूंमधून अंतिम संघ निवडला जाईल.

भारताच्या मुलांच्या संभाव्य संघात महाराष्ट्राच्या प्रसाद दिघोळे व अथर्व सोनवणे यांची निवड झाली आहे. तर, विदर्भाचे अनुज चौधरी व अजय राठोड या संघाचा भाग असतील. मुलींच्या संघात महाराष्ट्राच्या बिदिशा सोनार व सेरेना म्हसकर या दिसतील.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: PKL 12 Auction: शादलू सलग तिसऱ्या वर्षी दोन कोटींच्या पार, पवन सेहरावतची घटली किंमत