Breaking News

AUSvIND: महिलांपाठोपाठ पुरूष संघानेही चारली ऑस्ट्रेलियाला धूळ! तिसरा टी20 भारताच्या नावे, सुंदर-अर्शदीप चमकले

ausvind t20
Photo Courtesy: X

AUSvIND: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेला. होबार्ट येथे झालेल्या या सामन्यात भारताने 187 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादन केला. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने केलेली आक्रमक खेळी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यासह पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे.

AUSvIND India Beat Australia In 3rd ODI

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग व जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियाची वरची फळी लवकर बाद करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, टीम डेव्हिड याने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत 38 चेंडूंमध्ये 74 धावांची खेळी केली. त्यानंतर मार्केस स्टॉयनिसने 39 चेंडूमध्ये 64 धावा करत ऑस्ट्रेलियाला 186 अशा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी मिळवले.

बातमी अपडेट होत आहे…

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: मुंबईत इतिहास घडणार! भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार Womens Cricket World Cup 2025 ची फायनल