
Sikandar Shaikh Case: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी अटक केली होती. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई केली गेलेली. त्यानंतर या प्रकरणावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर लक्ष घालण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Rohit Pawar On Sikandar Shaikh Case
दोन दिवसापूर्वी सिकंदर याला पंजाब येथील मोहली या ठिकाणी अटक करण्यात आलेली. राजस्थानमधील पापला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले. या संपूर्ण प्रकरणानंतर अनेक जण हे षडयंत्र असल्याचे म्हणत त्याला पाठिंबा देत आहेत. तर, काहींनी त्याला शिक्षेची मागणी केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले,
‘सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो. याबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात खा. सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास आहे.’ या पोस्टच्या शेवटी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले.
त्यासोबतच महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी म्हटले, “सिकंदर शेख प्रकरणात महाराष्ट्र सरकार देखील चौकशी करेल. तो दोषी नसेल तर तो नक्कीच सुटेल.” याव्यतिरिक्त अनेक राजकीय व्यक्तींनी देखील त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Ajit Pawar च पुन्हा एकदा ऑलिम्पिक संघटनेचे दादा! केंद्रीय मंत्र्याच्या गटालाही देणार वाटा
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।