
Ajit Pawar Become Maharashtra Olympic Association President: रविवारी (2 नोव्हेंबर) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पदांची वाटप झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या गटांमध्ये वाटाघाटी होत ही निवडणूक बिनविरोध झाली. यासह अजित पवार हे चौथ्यांदा या पदावर विराजमान झाले.
आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठीची निवडणूक पार पडली.
भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर खेळांच्या माध्यमातून आपल्या देशाचा गौरव वाढवण्याचे प्रयत्न कायमच केले आहेत. त्यांनी खेळाडूंना… pic.twitter.com/aD0VAcksNQ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 2, 2025
Ajit Pawar Become Maharashtra Olympic Association President
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक ही मागील काही काळापासून चर्चेचा विषय ठरली होती. अजित पवार यांच्या विरोधात मोहोळ यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीतील पक्षाचे प्रयत्न केले जात होते. संघटनेशी संलग्न 31 पैकी 22 सभासद संघटनांनी पवार गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवार यांचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. असे असले तरी, मोहोळ गटाला काही पदे देण्यात येणार आहेत. मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्ष हे पद देण्यात आले.
यासह आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे व प्रशांत देशपांडे यांना देखील उपाध्यक्षपदावर नेमण्यात आले. नवीन कार्यकारणी दोन वर्ष राज्यात क्रीडाविषयक पायाभूत सुविधांवर काम करण्यासाठी प्रयत्न करेल. या निवडणुकीसाठी वाटाघाटी करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल या ज्येष्ठ नेत्यांनी विशेष प्रयत्न केले.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Sikandar Shaikh प्रकरणावर कोण काय-काय बोललं? रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।