
Rohit Sharma Retiring From Test Cricket: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वनडे व कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. रोहित आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
Rohit Sharma Retired From Test Cricket
🚨 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲 🚨
Rohit Sharma has informed us of his decision to retire from Test cricket. A legend of the red-ball game. We thank him for his stellar contributions. He will continue to lead Team India in ODIs.#TeamIndia | #RohitSharma pic.twitter.com/5cRRJB291s
— Indian Cricket Team (@incricketteam) May 7, 2025
आयपीएल 2025 सुरू असतानाच रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वजण चकीत झाले. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहितने स्वतः विश्रांती घेतली होती. मात्र, मालिकेतील आधीच्या तीन सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिलेली. यानंतर रोहित कसोटीतून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी रोहितने या चर्चा बिनकामाच्या असलेल्या म्हटलेले. मात्र, आता इंग्लंड दौऱ्याच्या आधी त्याने कसोटी क्रिकेट मधून थेट निवृत्ती घेत, आपली वनडे कारकीर्द लांबवण्याचा निर्णय घेतला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
रोहितने सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या कपड्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटला. आतापर्यंतच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आभार. वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे मी सुरू ठेवेल.’
रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये केली होती. आपल्या पहिल्या दोन सामन्यात त्याने तीन शतके झळकावलेली. त्यानंतर 2021 मध्ये त्याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2023 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी प्रवेश केला होता. त्याने आपल्या कारकीर्दीत 67 कसोटी सामने खेळताना 40.57 च्या सरासरीने 43.01 धावा केल्या. यामध्ये बारा शतकांचा समावेश होता.
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2024 टी20 विश्वचषक व 2025 वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे आता तो वनडे क्रिकेट 2027 पर्यंत खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Rohit Sharma Retired From Test Cricket)
“त्या दिवसापासून Rohit Sharma बदलला”, जवळच्या मित्राने केला रहस्यभेद, सांगितली ‘ती’ गोष्ट
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।