
Vaibhav Suryavanshi Century: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये सोमवारी (28 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (RRvGT) असा सामना खेळला गेला. गुजरातने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जयस्वाल व वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यांनी वेगवान सुरुवात केली. यादरम्यान वैभव याने केवळ 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून ठोकलेले हे आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले. यादरम्यान त्याने या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावे केला.
Vaibhav Suryavanshi Hits Fastest Century In IPL 2025
आपला केवळ तिसरा सामना खेळत असलेल्या 14 वर्षाच्या वैभव याने आपल्या खेळी दरम्यान सतरा चेंडूत अर्धशतक झळकावले. या हंगामातील निकोलस पूरन याच्या 18 चेंडूतील अर्धशतकाला त्याने मागे टाकले. तसेच, वैभव हा आयपीएल इतिहासात अर्धशतक पूर्ण करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज बनला. त्याने 14 वर्ष 32 दिवस इतक्या कालावधीत हे अर्धशतक झळकावले.
वैभव याने आपली ही खेळी अशीच पुढे नेत गुजरातच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले, त्याने 35 चेंडूवर शतक पूर्ण करताना आयपीएल इतिहासात भारतासाठी सर्वात वेगवान शतक झळकावले. त्याने या शतकासाठी केवळ 35 चेंडू घेतले. यूसुफ पठाण याने 2010 मध्ये राजस्थानसाठीच 37 चेंडूत शतक ठोकलेले. यासोबत एकाच खेळीत 11 षटकार ठोकले. हा देखील एक भारतीयकडून केला गेलेला विक्रम आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
Vaibhav Suryavanshi Hits Fastest Fifty In IPL 2025
‘वंडर बॉय’ Vaibhav Suryavanshi ने रचला इतिहास! 14 वर्ष आणि 23 दिवसांत केले IPL पदार्पण