![ayush badoni](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/08/ayush-badoni.jpg)
Ayush Badoni 165 In DPL 2024: सध्या दिल्ली येथे दिल्ली प्रीमियर लीग (Delhi Premier League 2024) खेळली जात आहे. या स्पर्धेत शनिवारी नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स विरुद्ध साऊथ दिल्ली सुपरस्टार्स असा सामना खेळला गेला. यामध्ये साऊथ दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 308 धावा कुटल्या. आयपीएलमध्ये नाव कमावलेला युवा अष्टपैलू आयुष बदोनी (Ayush Badoni) याने 165 धावांची तुफानी खेळी करत विश्वविक्रम बनवले.
AYUSH BADONI HAS JUST SCORED 165(55) WITH 19 SIXES 🤯🤯🤯🤯 pic.twitter.com/3SpihBALNL
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 31, 2024
Ayush Badoni 19 Sixes In DPL 2024
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार प्रियांश आर्या व दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बदोनी यांनी नॉर्थ दिल्ली संघाच्या फलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 286 धावांची भागीदारी केली. टी20 क्रिकेटमधील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. बदोनी याने केवळ 55 चेंडूंमध्ये 165 धावा ठोकल्या. यामध्ये केवळ आठ चौकार व तब्बल 19 षटकार सामील होते. त्याने यासह ख्रिस गेल याचा एका टी20 सामन्यातील सर्वाधिक 18 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. यासोबतच संघाने बनवलेली 308 ही टी20 क्रिकेटमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली Aysh Badoni World Record).
एका बाजूने आयुष याने ही मोठी खेळी केल्यानंतर कर्णधार आर्या याने देखील शतक ठोकले. बाद होण्यापूर्वी त्याने 50 चेंडूत 120 धावा केल्या. यामध्ये प्रत्येकी दहा षटकार व दहा चौकार सामील होते. त्याने एकाच षटकात सहा षटकार देखील मारले.
(Ayush Badoni Hits 165 In DPL 2024)
Joe Root च्या रडारवर Sachin Tendulkar चे 2 World Record, आणखी 5 वर्षे खेळला तर…