
Captain Cool MS Dhoni Trademark: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांत स्वभावाने महत्त्वाचे निर्णय घेत संघाला विजयी बनवण्यात तो पारंगत होता. इतर खेळात देखील अनेक कर्णधारांना या नावाने संबोधले जाते. मात्र, आता कॅप्टन कूल या नावाने केवळ धोनी यालाच ओळखले जाईल.
Captain Cool MS Dhoni Trademark
धोनीला आता कॅप्टन कूल हे नाव कायदेशीररित्या मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याने नुकतेच या नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज केला होता. तो आता स्वीकारला गेला आहे. धोनीने खेळ प्रशिक्षण, प्रशिक्षण सुविधा त्याच्यासाठी वर्ग 41 अंतर्गत नोंदणी केलेली. पुढील तीन महिन्यात कोणत्याही थर्ड पार्टी एजंटने आक्षेप न घेतल्यास हा ट्रेडमार्क धोनीला दिला जाईल.
हा ट्रेडमार्क त्याच्या नावाला ओळख देण्यासोबतच कायदेशीर संरक्षण देखील देईल. धोनीसाठी ही संपूर्ण प्रक्रिया त्याची वकील मानसी अग्रवाल हिने पूर्ण केली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच