
New Sports Minister In Modi 3.0|नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) मध्ये भाजपप्रणित एनडीएने (NDA) बहुमत मिळवले. त्यानंतर आता भारतात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार बनले आहे. मोदी 3.0 (Modi 3.0) अशी ओळख बनत चाललेल्या या सरकारचा रविवारी (9 जून) शपथविधी पार पडला. त्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत असलेल्या सरकारमध्ये अनेक ज्येष्ठ आणि युवा खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. यामध्ये माजी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांना देखील मंत्रीपद मिळाले. त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय (Sports & Youth Affairs Ministry) देण्यात आले (New Sports Minister In Modi 3.0)
Hon'ble Raksha ji Khadse, Heartily Congratulations for being appointed as 'Minister Of State (MoS), Youths Affairs & Sports Ministry….
Wish You Good Luck!@khadseraksha pic.twitter.com/FAhbtXFoCr— RAHUL KHARATMAL. (@rahul_kharatmal) June 10, 2024
यासोबतच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून रक्षा खडसे (Raksha Khadse) जबाबदारी पाहतील. त्या महाराष्ट्रातील रावेर येथून सलग तिसऱ्यांदा खासदार बनल्या आहेत.
(Mansukh Mandaviya Becomes New Sports & Youth Affairs Minister In Modi 3.0 Raksha Khadse Get MoS)
MCA President Amol Kale Passed Away, INDvPAK सामन्यांनंतर घडली दुर्दैवी घटना