Breaking News

‘गोवन डर्बी’ चर्चिल ब्रदर्सच्या नावे! डेम्पोला नमवत बनले I League चे टेबल टॉपर

I LEAGUE
Photo Courtesy; X/I League

I League 2024-2025 Goan Derby: सध्या सुरू असलेल्या आय लीग (I League 2024-2025) स्पर्धेत सहाव्या फेरीचे सामने सुरू आहेत. ‘गोवन डर्बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) विरुद्ध डेम्पो एससी (Dempo SC) या सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाने 2-0 अशी सरशी साधली. तब्बल 10 वर्षानंतर हे दोन्ही संघ आय लीगमध्ये समोरासमोर आले होते.

(Churchill Brothers Won Goan Derby In I League)

गोव्यातील राया मैदानावर हे दोन्ही संघ भिडले. सहाव्या फेरीनंतर अव्वल स्थानावर कोण राहणार यासाठी हा सामना महत्वपूर्ण होता. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चर्चिल ब्रदर्सने दमदार खेळ दाखवला. अवघ्या 14 व्या मिनिटालाच मिडफिल्डर लालसंघाई रेंथलेई याने गोल करत आपल्या संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात कोणालाही यश मिळाले नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ आक्रमक खेळ करत होते. मात्र, यश कोणालाही मिळाले नव्हते. अखेर, स्ट्रायकर वेडे लेके याने दुसरा गोल करत चर्चिल ब्रदर्सचा विजय निश्चित केला. या विजयासह त्यांनी सहा पैकी चार सामने जिंकत प्रथम स्थान काबीज केले.

(Churchill Brothers Won Goan Derby In I League 2024-2025)

हे देखील वाचा- अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? महिनाभरात बदलणार कसोटी संघाचे रूप