Breaking News

Durand Cup 2024: मोहन बागान पुन्हा फायनलमध्ये! बीएफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत

durand cup 2024
Photo Courtesy: X/Durand Cup

Durand Cup 2024: आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (2024) मधील दुसरा उपांत्य सामना मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व बेंगलुरू एफसी (Bengaluru FC) यांच्या दरम्यान खेळला गेला. पूर्ण वेळ व अतिरिक्त वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर, पेनल्टी शूटआउटमध्ये मोहन बागान सुपरजायंट्सने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर नॉर्थ ईस्ट युनायटेड (North East United FC) चे आव्हान असेल.

सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र, बचाव फळीने उत्कृष्ट कामगिरी करत गोल होऊ दिला नाही. लिस्टन कोलासो याच्या चुकीमुळे बेंगलुरू एफसीला मिळालेल्या पेनल्टीवर सुनील छेत्री याने गोल केला. पहिल्या हाफ च्या अखेरीस बेंगलुरूकडे ही निर्णायक आघाडी होती. त्यानंतर 51 व्या मिनिटाला विनीत याने आणखी एक गोल करत बीएफसीला आघाडीवर नेले.

मोहन बागान सुपरजायंट्ससाठी 68 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर पेट्राटोस याने पहिला गोल केला. त्यानंतरही मोहन बागानने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. अखेर त्यांना 84 व्या मिनिटाला यश मिळाले. अनिरुद्ध थापा याने गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पूर्ण वेळेत व अतिरिक्त वेळेत कोणताही गोल होऊ शकला नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पेनल्टी शूटआउटमध्ये पोहोचलेल्या या सामन्यात अखेर मोहन बागान 4-3 असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. बेंगलुरू एफसीसाठी होलीचरण नारझरी व जोवानोविक गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मोहन बागान सुपरजायंट्स अंतिम फेरीत पोहचले.

यावर्षीच्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी असेल. त्यांनी पहिल्या उपांत्य सामन्यात शिलॉंग लाजॉंग संघाला पराभूत केले होते. विशेष म्हणजे नॉर्थ ईस्ट युनायटेड प्रथमच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळेल. स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑगस्ट रोजी होईल.

(Mohun Bagan Supergiants Entered In Durand Cup 2024 Final)

जागतिक क्रिकेटमध्ये ‘शाह’ साम्राज्य! Jay Shah बनले नवे आयसीसी चेअरमन, यापूर्वी या 4 भारतीयांना मिळालेला मान