Breaking News

ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind edgbaston test day 1
Photo Courtesy: X

ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत 310 धावा उभारल्या. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. 

ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights

– नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

– भारतीय संघात तीन बदल; नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर व आकाशदीप यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी

– केएल राहुल केवळ 2 धावा करून त्रिफळाचित

– यशस्वी जयस्वाल व करूण नायर यांना अंपायर्स कॉलमुळे मिळाले प्रत्येकी एक जीवदान

-मिळालेल्या जीवदानांचा फायदा घेत दोघांनी केली 90 चेंडूंमध्ये 80 धावांची भागीदारी

– यशस्वीने पूर्ण केले आपले अकरावे कसोटी अर्धशतक

– पहिल्या सत्र संपण्यासाठी दोन षटके बाकी असताना करूण 31 धावा काढून बाद

– पहिल्या सत्राअखेर भारत 2 बाद 98

– दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताची सावध सुरुवात

– यशस्वी व कर्णधार शुबमन गिल यांची 131 चेंडू 66 धावांची भक्कम भागीदारी

– शतकाकडे वाटचाल करणारा जयस्वाल 87 धावा काढून बाद

– चहापानापर्यंत भारत 3 बाद 182; गिल 42 व पंत 14 धावांवर नाबाद

– तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला बसले दोन धक्के, पंत 25 तर नितिशकुमार रेड्डी अवघ्या एका धावेवर बाद

– शुबमन गिल याने रवींद्र जडेजाला साथीला घेत सावरला डाव

– गिलने मालिकेतील सलग दुसरे व कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक केले पूर्ण

– दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 5 बाद 310 धावा, गिल 114 व जडेजा 41 धावांवर नाबाद

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Against England: इंग्लंडवर यशस्वीची ‘बॉस’गिरी! अवघ्या 12 इनिंगमध्ये केलय सळो की पळो