
ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे सुरू झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.
🚨 Toss and Team Update 🚨
England win the toss and elect to bowl in the 2nd Test in Edgbaston.
Three changes for #TeamIndia
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/fGmkOLai7x
— BCCI (@BCCI) July 2, 2025
ENG vs IND Edgbaston Test England Won The Toss
पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 5 गड्यांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल केले गेले. जसप्रीत बुमराह याला विश्रांती देत वेगवान गोलंदाज आकाशदीप याला संघात जागा देण्यात आली. अष्टपैलू शार्दुल ठाकूर याच्या जागी युवा अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी याची वर्णी लागली. तर, पहिला सामन्यात पदार्पण केलेल्या साई सुदर्शन याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर हा या सामन्यात खेळताना दिसेल. इंग्लंडने या सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. (Latest Cricket News)
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग व शोएब बशीर.
भारत प्लेईंग इलेव्हन- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, आकाशदीप, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…