
ENG vs IND Edgbaston Test Preview: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे (India Tour Of England 2025). उभय संघादरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाईल. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
ENG vs IND Edgbaston Test Preview
हेडिंग्ले येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पाच गड्यांनी पराभूत व्हावे लागले होते. इंग्लंडने पाचव्या दिवशी 371 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादन केलेला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असेल. भारतीय संघ 1967 पासून या मैदानावर कसोटी सामने खेळत आहे. मात्र, अद्याप संघाला एक विजय मिळवता आलेला नाही. आठ पैकी केवळ एका सामन्यात भारतीय संघाने बरोबरी राखण्यात यश मिळवलेले.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. तर, भारतीय संघात दोन किंवा अधिक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त असला तरी त्याच्या खेळण्याचा निर्णय अंतिम क्षणी होईल. तर दुसऱ्या बाजूला साई सुदर्शन याला विश्रांती देत अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. खेळपट्टीचा अंदाज घेत वॉशिंग्टन सुंदर याला देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एजबॅस्टन येथे पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरा व तिसरा दिवस हा कसोटी क्रिकेटसाठी उत्कृष्ट असेल असे वेधशाळेने सांगितले आहे. चौथ्या दिवशी देखील ढगाळ वातावरण राहू शकतो. तर, सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. एजबॅस्टनची खेळपट्टी पारंपारिकरित्या वेगवान गोलंदाजांना मदतगार राहू शकते.
भारतातल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क करत आहे. सामन्याचे पहिले सत्र 3.30 ते 5.30 असे होईल. त्यानंतर लंचसाठी 40 मिनिटे दिली जातील. दुसरे सत्र 6.10 ते 8.10 असे खेळले जाणार आहे. त्यानंतर 20 मिनिटे चहापान झाल्यानंतर 8.30 ते 10.30 असे अखेरचे सत्र होईल.
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग व शोएब बशीर.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…