
ENG vs IND Manchester Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना बुधवारी (23 जुलै) मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू झाला. ढगाळ वातावरण असताना देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय फलंदाजांनी 4 बाद 264 अशी चांगली मजल मारली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) व युवा साई सुदर्शन (Sai Sudarshan) यांची अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.
Stumps on the opening day of the 4th Test in Manchester!
115 runs in the final session as #TeamIndia reach 264/4 at the end of Day 1.
Join us tomorrow for Day 2 Action 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/1KcCixeW7Q
— BCCI (@BCCI) July 23, 2025
ENG vs IND Manchester Test Day 1 Highlights
– इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, शुबमन गिलने गमावली सलग चौथी नाणेफेक
– इंग्लंड संघात जखमी शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसनला संधी, डॉसन आठ वर्षानंतर खेळला कसोटी
– भारतीय संघात तीन बदल, नितिशकुमार रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूर, आकाश दीपच्या स्थानावर अंशुल कंबोजला मिळाली पदार्पणाची संधी तर करूण नायरला डच्चू देत साई सुदर्शन भारतीय संघात
– यशस्वी जयस्वाल व केएल राहुल या दोन्ही सलामीवीरांनी गाजवले पहिले सत्र
– पहिल्या सत्रात भारत बिनबाद 78
– राहुलने इंग्लंडमध्ये पूर्ण केल्या 1000 कसोटी धावा
– दुसऱ्या सत्रात इंग्लंडचे पुनरागमन
– राहुल वैयक्तिक 46 धावांवर बाद, भारताला मिळाली 94 धावांची सलामी
– यशस्वी जयस्वालने पूर्ण केले अर्धशतक
– डॉसनच्या चेंडूवर 58 धावा करत झाला बाद
– कर्णधार शुबमन गिल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी, केवळ 12 धावांवर परतला तंबूत
– चहापानापर्यंत भारत 3 बाद 149
– तिसऱ्या सत्रात सुदर्शन व रिषभ पंतने वाढवला धावांचा वेग
– पंत इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा करणारा पहिला विदेशी यष्टीरक्षक बनला
– वैयक्तिक 37 धावांवर असताना जखमी होत पंत मैदानाबाहेर
– साई सुदर्शनने पूर्ण केले आपले पहिले कसोटी अर्धशतक
– बेन स्टोक्सने संपवली सुदर्शनची 61 धावांची खेळी
– दिवसाच्या अखेरीस जडेजा व शार्दुल ठाकूर यांनी 29 धावांची नाबाद भागीदारी करत सावरला डाव
– इंग्लंडसाठी बेन स्टोक्स याने दोन तर डॉसन व वोक्स यांनी प्रत्येकी एक बळी टिपला
– दिवसाखेर भारत 4 बाद 264
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: नाबाद 303 आणि बाकी काहीच नाही! Karun Nair च करियर संपल का?
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।