
Euro 2024|युरो 2024 मध्ये बुधवारी (19 जून) ब गटातील क्रोएशिया व अल्बेनिया (CRO vs ALB) यांच्या दरम्यान खेळला गेला. हॅम्बर्ग येथे झालेल्या या सामन्यात क्रोएशिया व अल्बेनिया दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. अखेरीस अल्बेनियासाठी जसुला (Klaus Gjasula) याने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करत 2-2 अशी बरोबरी साधून दिली.
🇦🇱 Last-minute madness 🤪#EURO2024 | #CROALB pic.twitter.com/3ZV6kX8uQE
— UEFA EURO 2024 (@EURO2024) June 19, 2024
ब गटातील या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला होता. क्रोएशियाला स्पेनने तर अल्बानियाला इटलीने पराभूत केलेले. या सामन्यात देखील क्रोएशियासाठी अनपेक्षित सुरूवात झाली. लासी याने अल्बेनियासाठी 11 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर क्रोएशिया संघाने बरोबरीचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश येत नव्हते.
दुसऱ्या हाफच्या देखील सुरुवातीला क्रोएशिया संघ काहीसख आक्रमक खेळताना दिसला. 74 व्या मिनिटाला यश आले. क्रॅमारिक याने संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या दोनच मिनिटानंतर जसुला याच्या पायाला लागून चेंडू अल्बेनियाच्याच गोलपोस्टमध्ये गेल्याने क्रोएशियाला आघाडी मिळाली. त्यानंतर दोन्ही संघांकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले.
पूर्ण वेळेनंतर मिळालेल्या पाच मिनिटांच्या इंजुरी टाईममध्ये अल्बेनियाचे नशिब उजळले. यापूर्वी स्वयंगोल केलेल्या जसुला यानेच निर्णयक गोल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली.
(Euro 2024 CRO vs ALB Draw Gjasula Shines)