
FIFA Club World Cup 2025 Final: अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंडमधील चेल्सी (Chelsea FC) व फ्रान्सचा पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) हे दोन्ही संघ या अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. न्यूयॉर्क येथे 13 जुलै रोजी हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांकडे दोन महिन्यात दुसरी मोठी ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल.
FIFA Club World Cup 2025 Final Chelsea vs PSG
Chelsea vs PSG for this beautiful trophy.
UP THE CHELS 🔵 pic.twitter.com/8IEFiGFjXG
— Conn (@ConnCFC) July 9, 2025
पहिल्या उपांत्य सामन्यात चेल्सीने ब्राझीलच्या फ्लुमिनंस संघाचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पीएसजीने स्पेनच्या रियाल माद्रिदला 4-0 अशा मोठ्या फरकाने हरवले. चेल्सीने दीड महिन्यांपूर्वीच युएफा कॉन्फरन्स लीग जिंकली होती. तर, याच दरम्यान पीएसजीने युएफा चॅम्पियन्स लीग आपल्या नावे केलेली. फिफा क्लब वर्ल्डकप अंतिम सामना 13 जुलै रोजी न्यूयॉर्क येथे होईल. (Latest Football News)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान, 2030 फिफा वर्ल्डकप लक्ष्य
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।