
FIFA Club World Cup 2025: अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 मध्ये रविवारी (29 जून) राऊंड ऑफ 16 चा महत्वपूर्ण सामना खेळला गेला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) नेतृत्व करत असलेल्या इंटर मियामी (Inter Miami) समोर फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) संघाचे आव्हान होते. पीएसजीने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 4-0 असा विजय संपादन केला.
FIFA Club World Cup 2025 PSG Beat Inter Miami
उपांत्यपूर्व फेरीसाठी झालेल्या या सामन्याची फुटबॉलप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, अनुभवी आणि अधिक कौशल्याने खेळणाऱ्या पीएसजीसमोर इंटर मियामीचा निभाव लागला नाही. जावो नेवेस याने सहाव्या मिनिटाला गोल करत पीएसजीचे खाते खोलले. त्यानंतर 39 व्या मिनिटाला त्यानेच गोल करत आघाडी 2-0 अशी केली. त्यानंतर एविलेस याने स्वयंगोल मियामीला आणखी अडचणीत टाकले. पहिला हा संपण्यासाठी काही क्षण बाकी असताना हकीमी याने गोल करत 4-0 अशी तगडी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. या विजयासह पीएसजी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तिसरा संघ बनला. तर, मेस्सीला आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध पराभूत होत स्पर्धेतून बाहेर जावे लागले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची
Chennai Bulls ठरली Rugby Premier League 2025 ची चॅम्पियन, दिल्ली रेड्झ उपविजेता