Breaking News

धक्कादायक! पोर्तुगालचा स्ट्रायकर Diogo Jota चे निधन, 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लग्नाला झालेले फक्त 10 दिवस

diogo jota
Photo Courtesy: X

Diogo Jota Passed Away In Car Accident: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा स्टार स्ट्रायकर डिओगो जोटा याचे गुरुवारी (3 जून) अपघाती निधन झाले. तो 29 वर्षांचा होता. या अपघातात त्याचा भाऊ देखील मृत्युमुखी पडला असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, केवळ दहा दिवसांपूर्वीच जोटा याचे लग्न झाले होते. 

Diogo Jota Passed Away In Car Accident

माध्यमातील माहितीनुसार, जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे यांचा स्पेनमधील सेर्नाडिला या भागात टायर फुटून गाडीला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. त्यामुळे आसपासच्या काही झाडांना देखील आग लागली. जोटा याने 22 जून रोजी पत्नी रूट हिच्याशी विवाह केला होता. या जोडप्याला तीन मुले आहेत. तर, त्याचा 26 वर्षीय भाऊ आंद्रे हा देखील व्यावसायिक फुटबॉलपटू होता.

जोटा हा सध्या प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूल संघासाठी खेळत होता. दीड महिन्यापूर्वीच त्याने लिव्हरपूलसोबत प्रीमियर लीग जिंकली होती. तर, मागील महिन्यात झालेल्या युएफा नेशन्स लीग स्पर्धा जिंकणाऱ्या पोर्तुगाल संघात देखील त्याचा समावेश होता. या स्पर्धेचा अंतिम सामना हाच त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा व्यावसायिक सामना ठरला. (Latest Football News)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।