Breaking News

भारतीय फुटबॉलची वाढणार शान! कॅनडाचा वादळी स्ट्रायकर Shaan Hundal खेळणार भारतासाठी?

shaan hundal
Photo Courtesy: X

Shaan Hundal Wants To Play For India: सध्या भारतीय फुटबॉल अडचणीच्या काळातून जात आहे. भारतातील फुटबॉल भविष्याचा विचार करता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) ओसीआय खेळाडू खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भारतासाठी खेळण्याकरिता पात्र असलेले भारतीय वंशाचे फुटबॉलपटू भारतासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळू इच्छितात. यामध्ये आता कॅनडाच्या शान हुंदल याचे देखील नाव सामील झाले आहे.

Shaan Hundal Wants To Play For India

एका भारतीय युट्युब चॅनलला मुलाखत देताना शान याने आपण भारतासाठी खेळण्याकरिता सकारात्मक असल्याचे म्हटले. याकरिता कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याचा देखील त्याने विचार असल्याचे सांगितले. शान याचे वडील भारतीय असल्याने तो ओसीआय खेळाडू म्हणून भारतासाठी खेळू शकतो. मात्र, या पुढे गोष्टी कशा घडतात यावर शानचे भारतीय फुटबॉलमधील भवितव्य अवलंबून आहे.

सध्या 26 वर्षांच्या असलेल्या शान याने टोरंटो एफसी संघासाठी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर वॅन्कुअर एफसी, वेलर एफसी, इंटर टोरंटो व लॉर्ड वॅडरडेल यासारख्या कॅनडातील प्रमुख क्लबसाठी त्याने खेळ दाखवला आहे. सध्या तो यॉर्क युनायटेड या कॅनडा प्रिमियर लीगमधील संघासाठी खेळतो. त्याने चालू हंगामात 14 सामन्यात 5 गोल केले आहेत. शान याने कॅनडाचे अंडर 17, अंडर 20 व अंडर 23 संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

ऑस्ट्रेलियन नागरिकत्व सोडत रायन विल्यम्स (Ryan Williams) याने भारतासाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अबनित भारती हादेखील भारतासाठी खेळण्याकरता पात्र झाला आहे. आगामी काळात युरोपमधील काही फुटबॉलर भारतासाठी खेळू शकतात.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Ryan Williams चा भारतीय फुटबॉल संघाला ‘ट्रिपल’ फायदा, ऑस्ट्रेलिया सोडून भारतासाठी खेळणे ठरणार ‘गेमचेंजर’