
Paris Olympics 2024: जागतिक खेळांची सर्वात मोठी स्पर्धा असलेला ऑलिंपिक्स खेळांना 26 जुलैपासून सुरूवात होत आहे. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे या स्पर्धा खेळल्या जातील. लवकरच भारतीय पथक स्पर्धांसाठी पॅरिसला रवाना होईल. तत्पूर्वी, भारताचा माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज व 2012 लंडन ऑलिंपिक्समध्ये कांस्य पदकविजेता गगन नारंग (Gagan Narang) याला भारतीय पथकाचा पथकप्रमुख (Chef The Mission) बनवण्यात आले आहे.
प्रत्येक ऑलिंपिक्स वेळी पथकाचा प्रमुख असतो. यावेळी गगन ही जबाबदारी सांभाळेल. यापूर्वी हे पद भारताची ऑलिंपिक्स पदकविजेती बॉक्सर मेरी कॉम हिच्याकडे होते. मात्र, मार्च महिन्यात मेरी हिने या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उप-पथकप्रमुख असलेल्या गगन याच्याकडे ही जबाबदारी आली. पथकप्रमुख म्हणून खेळाडूंना हव्या त्या सर्व सुविधांची खातरजमा करण्याचे, खेळाडूंना सरावासाठी मैदानी उपलब्ध करून देणे व आयोजकांशी सतत संपर्कात राहणे ही महत्त्वाची कामे त्याला करावी लागणार आहेत.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
गगन हा भारताच्या यशस्वी नेमबाजांपैकी एक आहे. लंडन ऑलिंपिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकलेले. याव्यतिरिक्त राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा तसेच इतर जागतिक स्पर्धांमध्ये त्याने अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत.
पॅरिस ऑलिंपिक्ससाठी आतापर्यंत भारताच्या 111 खेळाडूंनी पात्रता मिळवली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाचे ध्वजवाहक म्हणून दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) व आपले सहावे ऑलिंपिक्स खेळत असलेला टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) यांची निवड केली गेली आहे.
(Gagan Narang Appointed As India Chef Of Mission For Paris Olympics 2024)