Breaking News

Lords Test: पदार्पणातच धडाडली Gus Atkinson ची तोफ! इंग्लंडसमोर वेस्ट इंडिज 121 धावांत गारद

gus atkinson
Photo Courtesy: X/ Surrey Cricket

Gus Atkinson 7fer In Lords Test: बुधवारी (10 जुलै) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्या दरम्यान पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. लॉर्ड्स (Lords Test) येथे होत असलेल्या या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशीच आपले वर्चस्व राखले. पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन (Gus Atkinson) याने तब्बल सात बळी मिळवत पाहुण्या संघाचा पहिला डाव 121 धावांवर संपवला. यासोबतच कसोटी पदार्पणात (Gus Atkinson Test Debute) इंग्लंडसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson Last Test) याचा हा अखेरचा सामना आहे. या सामन्यात इंग्लंडसाठी गस ऍटकिन्सन व यष्टीरक्षक जॅमी स्मिथ यांनी पदार्पण केले. प्रथम गोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाहुण्या संघाला डोके वर काढू दिले नाही. दोन्ही सलामीवीरांनी 36 धावांची भागीदारी केल्यानंतर पुढील आठ धावांत त्यांनी तीन गडी गमावले. अथानेझ व हॉज यांनी 44 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र, 88 धावसंख्येवर वेस्ट इंडीजने सलग 4 बळी गमावले. अखेरीस त्यांचा डाव 121 धावांवर संपुष्टात आला. ऍटकिन्सनने 45 धावांमध्ये 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर ऍंडरसन, वोक्स व स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

गस ऍटकिन्सन याने अनेक दिग्गजांना मागे टाकत इंग्लंडसाठी पदार्पण करताना सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजात तिसरे स्थान पटकावले. या यादीमध्ये पहिल्या स्थानी जॉन फेरीस हे असून त्यांनी 1892 मध्ये 37 धावांत 7 गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या स्थानी डॉमिनिक कॉर्क असून त्यांनी 1995 मध्ये 43 धावांत 7 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला. विशेष म्हणजे कॉर्क यांनी देखील लॉर्ड्सवरच आणि वेस्ट इंडिजविरुद्धच ही कामगिरी केलेली.

(Gus Atkinson 7 fer In Test Debute At Lords Test)