Breaking News

Harmanpreet Kaur ची उंच उडी, वनडे क्रमवारीत टॉप-10 मध्ये जागा; Smriti Mandhana चे मात्र नुकसान

ICC ODI Ranking :- मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDW vs SAW) झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी चमकदार प्रदर्शन केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) यांनी दक्षिण आफ्रिका संघाला मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता या शानदार प्रदर्शनाचे बक्षिस कर्णधार हरमनप्रीतला मिळाले आहे. हरमनप्रीतने आयसीसीच्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत टॉप 10 फलंदाजांमध्ये उडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरमनप्रीतच्या बॅटने लाजवाब कामगिरी केली. पहिल्या सामन्यात अवघ्या 10 धावांची लाजवाब खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने शानदार नाबाद शतक झळकावले. 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने हरमनप्रीतने नाबाद 103 धावांची खेळी केली. त्यानंतर तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही तिने 42 धावा केल्या. या खेळींचा हरमनप्रीतला फायदा झाला आणि भारतीय कर्णधार आयसीसी महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी उडी घेत नवव्या स्थानावर पोहोचली आहे. सध्या तिच्या खात्यात 648 गुण आहेत.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 2 शतके करण्याची किमया साधणारी उपकर्णधार स्म्रीती मात्र एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आली आहे. 738 गुणांसह तिने टॉप 10 मधील आपले स्थान अबाधित राखले आहे.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने अव्वल मानांकन मिळवण्याच्या दिशेने जोरदार पावले उचलली आहेत. ती तीन स्थानांनी भरारी घेत दुसऱ्या स्थानावर आली आहे आणि ती इंग्लंडची अव्वलस्थानी विराजमान असलेली फलंदाज नेट सायव्हर-ब्रंटपेक्षा फक्त 16 गुणांनी मागे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *