Breaking News

मुंबईत इतिहास घडणार! भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार Womens Cricket World Cup 2025 ची फायनल

womens cricket world cup 2025
Photo courtesy: X

ICC Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात होत असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळाला जाईल. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियमवर यजमान भारत व दक्षिण आफ्रिका (INDW v SAW) आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी विजेतेपद मिळवले नसल्याने, महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणे निश्चित आहे. 

ICC Womens Cricket World Cup 2025 Final Preview

पहिला सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत सातत्यपर्ण कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला यजमान भारताचे मोठे आव्हान असेल. साखरी फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक धावांचा पाठलाग करत भारताने अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे हा सामना थरारक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दक्षिण आफ्रिका संघाची मदार प्रामुख्याने कर्णधार लॉरा वॉल्वर्ट, अनुभवी मारिझान काप व नॅडीन डी क्लर्क यांच्यावर असेल. तर, भारताला आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना व रेणुका ठाकूर यांच्याकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असेल. उपांत्य सामन्याची नायिका ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज व श्री चरणी यांच्यावर पुन्हा एकदा सर्वांची नजर असणार आहे.

डी.वाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा एकदा फलंदाजांना व फिरकीपटूंना मदत करणारी असेल. तसेच रविवारी हलकेसे ढगाळ वातावरण असल्याने, वेगवान गोलंदाज देखील याचा फायदा घेऊ शकतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स व जिओ हॉटस्टार येथे सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण! रेकॉर्ड चेससह टीम इंडिया Womens Cricket World Cup 2025 च्या फायनलमध्ये