Breaking News

IND vs AFG Preview| टीम इंडियाला जड जाणार अफगाणिस्तान? बार्बाडोसमध्ये विजयी सुरुवातीचा रोहित सेनेचा मनसुबा

ind vs afg preview
Photo Courtesy: X/BCCI

IND vs AFG Preview|

टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधील सुपर 8 फेरीचे (Super 8) सामने बुधवारी (19 जून) सुरू होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात करेल. सुपर 8 मध्ये भारत आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) खेळणार आहे. या सामन्यासाठी कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेऊ.

साखळी फेरीत अजिंक्य रहात भारताने पुढच्या फेरीत वाटचाल केली. तर अफगाणिस्तानला देखील केवळ एक पराभव पत्करावा लागला. हा सामना बार्बाडोस येथे होणार असून, या मैदानावर मोठी धावसंख्या उभारली जाते. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल अपेक्षित आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या जागी सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला संधी मिळू शकते. भारतीय फलंदाज डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध चाचपडत असताना, यशस्वी हा मोठ्या धावा करू शकतो.

या सामन्यात भारताचे मतदार पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी त्रिकूट आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल. तसेच साखळी फेरीत पूर्णतः अपयशी ठरलेल्या विराट कोहली याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. कर्णधार ‌रोहित शर्मा व उपकर्णधार हार्दिक पंड्या हे देखील संघासाठी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करतील.

दुसरीकडे अफगाणिस्तान संघ आपल्या पहिल्या तीन सामन्यात चांगला फॉर्ममध्ये दिसला होता. डावखुरा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत. फिरकी त्रिकूट राशीद, नबी व नूर यांनी मधल्या षटकात संघांना रोखण्याचे काम केले. फलंदाजीत गुरबाज व गुलबदीन नईब यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली नाही. त्यामुळे पूर्ण सामना पार पडू शकतो. भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी (20 जून) सायंकाळी आठ वाजता हा सामना बार्बाडोस येथे सुरू होईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान- इब्राहिम झादरान, रहमानुल्लाह गुरबाज, गुलबदीन नईब, अझमत ओमरझाई, नजीब झादरान, मोहम्मद नबी, करिम जनत,राशिद खान (कर्णधार), फझलहक फारूकी, नूर अहमद व नवीन उल हक.

(IND vs AFG Preview In Super 8)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *