IND vs AUS, T20 World Cup Super 8 :- सोमवारी (24 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सुपर 8 सामना होणार आहे. हा दोन्ही संघांचा शेवटचा सुपर 8 सामना असेल. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी असेल. तर ऑस्ट्रेलियासाठी ही करा अथवा मराची लढत असेल. ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतील. मात्र या सामन्यात मेघराजा ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवू शकतो. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता (Weather Report) वर्तवली जात आहे.
डॅरेन सॅमी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यादरम्यान सेंट लुसियामधील हवामान खराब राहू शकते. पावसाची एकूण शक्यता 56 टक्के आहे. अशा परिस्थितीत जर हा सामना पावसामुळे वाहून गेला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. यानंतर भारतीय संघाचे एकूण पाच गुण होतील आणि ते उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे एकूण तीन गुण असतील. यानंतर त्यांना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ 19 वेळा जिंकला आहे, तर भारताने 11 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याच वेळी, टी20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने खेळले गेले, ज्यामध्ये भारताने तीन सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले. 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेत, भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेर केले होते. अशा परिस्थितीत भारताकडे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा/संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, ॲश्टन अगर, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.
Some genuinely wonderful blog posts on this web site, regards for contribution.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Great write-up, I¦m normal visitor of one¦s site, maintain up the nice operate, and It’s going to be a regular visitor for a long time.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.