T20 World Cup 2024, INDvPAK: जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रविवार (दि. 9 जून) हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील 19व्या सामन्यात सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने आहेत. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वादळी फलंदाजी पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत. यामध्ये विराटची पत्नी अनुष्का शर्मा आणि रोहितची पत्नी रितिका सजदेह यांचाही समावेश आहे. मात्र, जेव्हा विराट आणि रोहित दोघेही बाद झाले, तेव्हा त्यांच्या पत्नींची रिऍक्शनने सर्वांचे लक्ष वेधले. आता त्यांच्या रिऍक्शनचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.
अनुष्का आणि रितिकाची रिऍक्शन
झाले असे की, पाकिस्तान (Pakistan) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाकडून (Team India) डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli And Rohit Sharma) मैदानात उतरले. मात्र, पहिल्या तीन षटकातच भारताला दोन धक्के बसले. आधी विराट कोहली (Virat Kohli) शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर हॅरिस रौफच्या हातून 4 धावांवर झेलबाद झाला.
त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नसीम शाह टाकत असलेल्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर उस्मान खानच्या हातून 13 धावांवर झेलबाद झाला. आपल्या पतीला बाद होताना पाहून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रितिका सजदेह (Ritika Sajdeh) दोघीही निराश झाल्या. दोघींची रिऍक्शन (Anushka Sharma And Ritika Sajdeh Reaction) आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Ritika Sajdeh Anushka Sharma#INDvsPAK #ViratKohli #RohitSharma #AnushkaSharma pic.twitter.com/1VxwRw4r72
— Mufa Kohli (@MufaKohli) June 9, 2024
विराटकडे होती विक्रम रचण्याची संधी
विराट कोहली जसा 4 धावांवर बाद झाला, तसा तो विश्वविक्रमाला मुकला. विराटने या सामन्यात 12 धावा केल्या असत्या, तर तो भारत-पाकिस्तान (India-Pakistan) टी20 सामन्यात 500 धावा करणारा पहिला खेळाडू बनला असता. आजपर्यंत कुठलाच क्रिकेटपटू हा विक्रम करू शकला नाहीये. (ind vs pak t20 world cup 2024 anushka sharma and ritika sajdeh reaction viral after virat kohli rohit sharma wicket)
हे वाचलंत का?
INDvsPAK, T20 World Cup 2024: ‘विराट जेव्हा लाहोरला खेळायला येईल, तेव्हा…’, सर्वत्र रंगलीय पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या विधानाची चर्चा
“बाबर विराटच्या चप्पलीसारखाही नाही”, माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, वाचा नक्की काय म्हणाला…