World Boxing Championship 2025: इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सर्सने दणदणीत यश मिळवले. भारतीय बॉक्सर्सने दोन सुवर्णांसह चार पदके आपल्या नावे केली. अलीकडच्या काळातील भारतीय बॉक्सर्सची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
🥊 4 Medals for India at the World Boxing Championships! 🇮🇳✨
🥇 Jaismine (57kg)
🥇 Minakshi (48kg)
🥈 Nupur (+80kg)
🥉 Pooja (80kg)Indian women boxers bring home 2 Gold, 1 Silver & 1 Bronze a campaign to remember! 💥#WorldBoxingChampionship #TeamIndia https://t.co/h3DS23fPIJ pic.twitter.com/adqSvvtSS5
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) September 14, 2025
India Clinch 4 Medals In World Boxing Championship 2025
लिव्हरपूल येथे झालेल्या या स्पर्धेत अनुभवी पूजा राणी हिने भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिला 80 किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तिने आपले कांस्यपदक निश्चित केले. तर, 80 पेक्षा जास्त वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नुपूर शेरॉनला थोडक्यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तिने रौप्य पदकाची कमाई केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेल्या जास्मिन लाम्बोरिया (Jasmine Lamboria) हिने जागतिक स्पर्धेत हे अपयश धुवून काढले. तिने 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पटकावले. असे कामगिरी करणारी ती नववी भारतीय महिला बॉक्सर बनली. तर, मीनाक्षी हुडा (Minakshi Hooda) हिने 48 किलो वजनी गटात आणखी एक सुवर्ण भारताच्या पदरात टाकले. कझाकस्तान व उझबेकीस्तान यांच्यानंतर भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
(Latest Sports News In Marathi)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कॅप्टन रजतचे पुन्हा सोनेरी यश! Duleep Trophy 2025 मध्य विभागाच्या नावे