
Team India Probable Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापन हे बदल करण्याची शक्यता आहे.
Team India Probable Playing XI For Birmingham Test
फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही भारतीय संघाला हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर भारताच्या गोलंदाजी विभागात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तंदुरुस्त असला तरी प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाऊ शकते. तर, रवींद्र जडेजा व करूण नायर या दोघांपैकी एकाच्या जागी अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी (Nitishkumar Reddy) याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर, दुसरा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हा देखील प्लेईंग इलेव्हनचा भाग बनू शकतो. (Latest Cricket News)
भारतीय संघाला पहिल्या कसोटीत 6 गडी राखून पराभूत व्हावे लागले होते. भारताच्या फलंदाजांनी दोन्ही डावात मिळून 5 शतके झळकावली होती. मात्र, गोलंदाजांच्या व क्षेत्ररक्षकांच्या गचाळ कामगिरीमुळे संघाला पराभव स्वीकारावा लागलेला. बर्मिंगहॅम कसोटी जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच