India Squad For T20 World Cup 2026

india sqaud for t20 world cup 2026
Photo Courtesy X

India Squad For T20 World Cup 2026: पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विजेतेपद राखण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळेल. तर, अनुभवी अष्टपैलू अक्षर पटेल हा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. यासोबतच न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी देखील भारतीय संघ घोषित केला गेला.

India Squad for t20 world cup 2026

शनिवारी जाहीर झालेल्या संघात 13 नावे अपेक्षित असलेली दिसली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपकर्णधार म्हणून खेळलेला कसोटी व वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल आपली जागा वाचवू शकला नाही. तर, यष्टिरक्षक जितेश शर्मा हा देखील अंतिम संघात जागा बनवण्यात अयशस्वी ठरला. झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणारा ईशान किशन मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करेल. तर, रिंकू सिंग हा देखील विश्रांतीनंतर संघाचा भाग बनला.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, ईशान किशन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह व हर्षित राणा.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: शहापूरचा Omkar Tarmale खेळणार सनरायझर्ससाठी! बचत गटाचे कर्ज, टेनिस क्रिकेट आणि आता आयपीएल 2026 चे मैदान