
India Tour Of England 2026: सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळतोय. त्यानंतर आता भारतीय संघ पुढील वर्षी आणखी एक इंग्लंड दौरा करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने सार्वजनिक केले.
5⃣ T20Is. 3⃣ ODIs
📍 England
Fixtures for #TeamIndia's limited over tour of England 2026 announced 🙌#ENGvIND pic.twitter.com/Bp8gDYudXW
— BCCI (@BCCI) July 24, 2025
India Tour Of England 2026 Schedule
सध्या कसोटी मालिका खेळत असलेला भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. या दौऱ्यावर पाच टी20 व तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. जुलै महिन्यात या मालिका होतील. तसेच, भारतीय महिला संघ देखील टी20 मालिका आणि एकमेव कसोटी खेळेल.
इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) टी20 मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी20 सामना 1 जुलै (डरहॅम)
दुसरा टी20 सामना 4 जुलै (मँचेस्टर)
तिसरा टी20 सामना 7 जुलै (नॉटिंगहॅम)
चौथा टी20 सामना 9 जुलै (ब्रिस्टल)
पाचवा टी20 सामना 11 जुलै (साऊथॅम्पटन)
इंग्लंड विरुद्ध भारत वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे सामना 14 जुलै (बर्मिंगहॅम)
दुसरा वनडे सामना 16 जुलै (कार्डिफ)
तिसरा वनडे सामना 19 जुलै (लॉर्ड्स)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Rishabh Pant बद्दल धक्कादायक बातमी, टीम इंडिया संकटात, वाचा सविस्तर