
Asia Cup Hockey 2025: राजगिर येथे झालेल्या आशियात चषक हॉकी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला 4-1 असे सहज पराभूत करत चौथ्यांदा या मानाच्या स्पर्धेचा मुकुट मिळवला. या विजेतेपदासोबतच भारताने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली.
Indian Hockey Team Won Asia Cup Hockey 2025
बिहारच्या राजगिर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या स्पर्धेत भारत व दक्षिण कोरिया हे दोन्ही संघ एकही सामना न गमवता अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. साखळी फेरीत या दोन्ही संघातील सामना बरोबरीत सुटलेला. अंतिम सामन्यात मात्र भारतीय संघाने दक्षिण कोरियाच्या संघाला कोणतीही संधी न देता 4-1 अशा फरकाने विजय संपादन केला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मलेशियाने चीनला पराभूत केले.
(Latest Sports News In Marathi)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: US Open 2025 वर अल्कारेझचा कब्जा! सिन्नर पुन्हा उपविजेता
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।