
Ro-Ko Shines In Sydney ODI: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची शनिवारी (25 ऑक्टोबर) समाप्ती झाली. सिडनी येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाबाद शतक झळकावणारा रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. यासह रोहित व विराट यांनी ऑस्ट्रेलियातील आपल्या कारकिर्दीची समाप्ती देखील केली.
Ro-Ko Shines In Sydney ODI Win
भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतासमोर क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान होते. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने यजमान संघाला 236 पर्यंत रोखण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले. ऑस्ट्रेलियासाठी एकमेव अर्धशतक मॅट रेनशॉ याने झळकावले. भारतासाठी हर्षित राणा याने सर्वाधिक चार तर वॉशिंग्टन सुंदर याने दोन बळी मिळवले.
विजयासाठी 237 भावांचे आव्हान मिळाल्यानंतर भारतासाठी कर्णधार शुबमन गिल व रोहित शर्मा यांनी 10.2 षटकांत 69 धावांची सलामी दिली. गिल 24 धावा काढून बाद झाल्यानंतर रोहित व विराट यांनी भारताला नाबाद भागीदारी करून विजय मिळवून रोहितने आपल्या कारकिर्दीतील 33 वे वनडे शतक पूर्ण केले. रोहितने नाबाद 121 तर विराटने नाबाद 74 धावा केल्या. रोहितला सामनावीर व मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Rohit Sharma: सिडनीत हिटमॅनची हार्ड हिटिंग! 33 व्या वनडे शतकाला घातली गवसणी
kridacafe