
Team India Stats In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चाहत्यांची चिंता वाढवतेय. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर 58 वर्षात एकदाही कसोटी सामना जिंकलेला नाही.
Team India Stats In Edgbaston Test
भारतीय संघाने 1967 मध्ये या मैदानावर पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारताचा 132 धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर 1974 व 1979 मध्ये भारतीय संघाला डावाने पराभूत व्हावे लागलेले. कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1986 मध्ये आपला पहिला व अखेरचा सामना अनिर्णित राखला.
त्यानंतर भारतीय संघाला 1996 मध्ये मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नेतृत्वात पुन्हा एक पराभव पाहावा लागला. एमएस धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये भारताला सर्वात मोठा पराभव पत्करावा लागलेला. एक डाव व 242 धावांनी भारत या सामन्यात पराभूत झालेला. तर, 2018 व 2022 या दोन्ही दौऱ्यात हे भारतीय संघ विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघाकडे या मैदानावर पहिला विजय मिळवण्याची संधी असेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: डॉक्टर्स डे स्पेशल: कोण आहेत Dr Dinshaw Pardiwala ? ज्यांच्यावर आहे प्रत्येक भारतीय खेळाडूचा 100% विश्वास
Chinnaswamy Stadium Stampede बाबत कोर्टाचा मोठा निर्णय, 11 जणांच्या मृत्यूला यांना धरले जबाबदार